विज्ञानातील प्रगती, पर्यावरणाची काळजी व मानवतावादी प्रयत्न या तीनही बर्याच व्यापक विषयांचा अद्ययावत मागोवा घेणे हे केवळ एका व्यक्तीने करण्यासारखी गोष्ट नव्हे. त्यामुळे नेहमीचे माझे वाचक किंवा या ब्लॉगला अधुनमधुन भेट देणार्यांपैकी कोणालाही पुढील दोन प्रकारांनी या ब्लॉगवरील माहितीत भर घालता येइल.
तुमची गोष्ट मला पाठवा:
माझी खात्री आहे की तुम्हा सर्वांनाच अशा गोष्टी, व्यक्ती, संस्था किंवा बातम्या माहीत असतील ज्यांची अधिक लोकांना माहिती व्हावी असे तुम्हाला वाटत असेल. त्या मनोरंजक, उपयुक्त आहेत म्हणून असेल किंवा पठडीबाहेरील काहीतरी लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून असेल. तुमच्याकडे अशी माहिती असल्यास ती मला पाठवा आणि शक्य झाल्यास काही छायाचित्रेही. पण त्या माहितीतून एक संपूर्ण ब्लॉगपोस्ट लिहीता येऊ शकेल एवढी ती आहे याची खात्री करा. शक्यतो मी विज्ञान, पर्यावरण व मानवतावादी प्रयत्न यांविषयी लिहीते. परंतू कुठल्याही विषयाची मला allergy नाही.
स्वतःच लेखक व्हा:
तुमच्याकडे मनोरंजक, उपयुक्त किंवा लोकांना ज्याची महिती झालीच पाहिजे अशी गोष्ट किंवा बातमी आहे? आणि ती तुम्हाला स्वतःच्याच शब्दांमध्ये मांडायची आहे? नक्कीच तुम्ही तसे करू शकता. मी असे सुचवीन की तत्पुर्वी तुम्ही या ब्लॉगवरील आधीचे काही पोस्ट वाचा म्हणजे तुम्हाला साधारण लेखाच्या स्वरूपाची कल्पना येईल. तुमचा लेख 600 ते 800 शब्दांचा असावा. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही एखादाच लेख लिहा किंवा तर तुमच्याकडे बरेच 'सांगण्यासारखे काही' असेल तर नियमितपणे लेख लिहीत रहा. आणि ती नियमितता जर आठवड्याला एक लेख इतकी असेल तर तुम्ही 'सांगण्यासारखे काही'चे सह-लेखक/लेखिका म्हणून स्वतःचे 'लेखकाचे/लेखिकेचे मनोगत'ही लिहू शकाल.
संपर्क: radical9680 at hotmail dot com