दिनांक २४ ऑक्टोबर २०१०च्या लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीमध्ये छापून आलेला माझा लेख,

आपण बसमध्ये बसलेले असतो. बसचे इंजिन आणि हॉर्नच्या आवाजाबरोबरच आजूबाजूच्या ट्रॅफिकचा आवाजही सोबतीला असतो. बसमधले लोक मोठमोठय़ाने आपल्या मोबाइलवर बोलत असतात. त्यांच्याकडे आपण त्रासिकपणे बघतो. कुठेतरी रस्त्याचे, नाहीतर बिल्डिंगचे काम चालू असते. त्यामुळे आपल्या नादविश्वात त्या भरभक्कम यंत्रांच्या भरदार आवाजांची भर पडते. तेवढय़ात कुठूनतरी एक मिरवणूक वाजतगाजत येते आणि कानठळ्या बसवणारे ढोलताशे, सॅक्सोफोन यांचे आवाज आपल्या सहनशक्तीचा अंत पाहू लागतात. न राहवून आपण आपला मोबाइल व त्याचे हेडफोन्स बाहेर काढतो आणि हे सर्व नकोसे आवाज विरून जातील इतक्या मोठय़ा आवाजात आपली आवडती गाणी ऐकू लागतो. थोडय़ा वेळाने आपला मोबाइल वाजतो.. किंबहुना तो व्हायब्रेट होतो म्हणूनच केवळ आपल्याला त्याची जाणीव होते. मग आपण गाणी ऐकणे थांबवून कॉल घेतो. पलीकडून येणाऱ्या आवाजासारखेच अनेक कर्कश आवाजांचे पाश्र्वसंगीत सोबत असते. मग मोबाइलसकट तोंडावर हात ठेवून आपण बसमधील इतरांसारखेच मोठमोठय़ाने बोलू (?) लागतो.. या साऱ्या आवाजांच्या गदारोळात आपला आवाज पलीकडच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा