२ जाने, २०११

विनाशविरहित विकासवाटा

दिनांक २ जानेवारी २०११च्या लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीमध्ये छापून आलेला माझा लेख,

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच ठाणे येथे पार पडले. साहित्य संमेलन हा मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्याला कारणीभूत आहे ते मराठी भषिकांचे आपल्या भाषेवरील निस्सीम प्रेम आणि त्यांची रसिकता! भाषा आणि तिचा अनेकविध पद्धतीने वापर करण्याची क्षमता ही माणसाच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा पलू आहे. आपल्या जीवनाचे, असेच अनन्यसाधारण महत्त्व असलेले आणखी एक अंग म्हणजे विज्ञान. आपल्या दैनंदिन जीवनात मोबाइल फोनपासून फ्लायओव्हपर्यंत बहुविध रूपात अवतरणारे विज्ञान! कधी अ‍ॅटॉमिक बॉम्बसारख्या विनाशकारी स्वरूपात, तर कधी एखाद्या  लशीसारख्या जीवनदायी स्वरूपात सामोरे येणारे विज्ञान. पण अशा सर्वव्यापी विज्ञानाची आपण म्हणावी तशी दखल घेत नाही. शाळेत पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी गरजेचे असल्यामुळे ज्याचा अभ्यास करावा लागतो ते विज्ञान, ही आपल्या मुलांना होणारी विज्ञानाची पहिली ओळख. पण ही ओळख बदलून विज्ञानाबद्दल केवळ लहानग्यांनाच नव्हे, तर सर्वानाच उत्सुकता आणि जवळीक वाटावी- यासाठी महाराष्ट्रात काही संस्था आणि व्यक्ती अनेक वष्रे कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने दरवर्षी काही उपक्रम हाती घेतले जातात. त्यापकी एक आणि मोठा  उपक्रम म्हणजे ‘अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन’.

संपूर्ण लेख वाचाण्यासाठी ... http://bit.ly/LS_02_01

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: