२०११ हे वर्ष युनायटेड नेशन्सने 'आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष' (International year of Chemistry) म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त आपल्या दैनंदिन जीवनातील व परिसरातील रसायने आणि रसायनशास्त्र यांची ओळख करून देणारे पाक्षिक सदर, 'रस'आस्वाद, लोकसत्ता दैनिकाच्या 'चतुरंग' पुरवणीत सुरू केले आहे. त्यात १५ जानेवारी रोजी छापून आलेला माझा लेख.
सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक व्होल्टेर म्हणाला होता, 'What a heavy burden is a name that has become too famous' या उक्तीप्रमाणे सर्वच क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींना आपल्या नाममहात्म्याचे ओझे वहावेच लागते. नाव या गोष्टीविषयी अनेकांची अनेक मते आहेत. नावाविषयीचे बहुधा सगळ्यात जास्त प्रसिद्धी पावलेले विधान हे शेक्सपिअरच्या ज्युलिएट या नायिकेच्या तोंडी असलेले, 'What’s in a name?' हे असावे. कोणी अतिप्रसिद्ध नावाला ओझे मानो किंवा ‘नावात असे आहेच काय’ असा प्रश्न करो, शेवटी प्रत्येक व्यक्तीला, सजीवाला, वस्तूला आणि अमूर्त गोष्टींनाही नाव दिल्याशिवाय काही आपण रहात नाही. संपूर्ण विश्वात विविध रूपात आणि वेगवेगळ्या प्रमाणात अस्तित्त्वात असलेली मूलद्रव्ये (elements) तरी याला अपवाद कशी असतील?
संपूर्ण लेख : http://bit.ly/LS_15_01