मानव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मानव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२६ डिसें, २०१०

विविधतेत समृद्धता

दिनांक २६ डिसेंबर २०१०च्या लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीमध्ये छापून आलेला माझा लेख,

एखादा पदार्थ तुमच्या कितीही आवडीचा असला तरी रोजच्या रोज फक्त तो एकच एक पदार्थ तुम्हाला कोणी खायला लावला तर काही दिवसांतच तो पदार्थ तुम्हाला अगदी नकोसा होईल. तुमच्या आयपॉडमध्ये सतत एकच गाणे वाजत राहिले तर शेवटी वैतागून तुम्ही तो आयपॉड भिरकावून द्याल! कारण आपल्याला जीवनात वैविध्याची आवड असते. मानवामध्ये असलेली ही वैविध्याची ओढ अगदी त्याच्या आदिमानव रूपातही अस्तित्त्वात होती. वेगवेगळी फळे चाखून आणि अनेक प्रकारच्या प्राण्यांचे मांस खाऊनच आपल्या पूर्वजांनी योग्य आहाराची निवड केली.   पण पुढे वैविध्यपूर्ण प्रगती मानवाला साधता आली, ती त्याच्यापुढे असलेल्या अनेकविध पर्यायांमुळे आणि हे पर्याय उपलब्ध झाले ते निसर्गातील विविधतेमुळे.

संपूर्ण लेख वाचाण्यासाठी ... http://bit.ly/LS_26_12

२४ ऑक्टो, २०१०

कल्लोळ आवाजांचा!

दिनांक २४ ऑक्टोबर २०१०च्या लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीमध्ये छापून आलेला माझा लेख,

आपण बसमध्ये बसलेले असतो. बसचे इंजिन आणि हॉर्नच्या आवाजाबरोबरच आजूबाजूच्या ट्रॅफिकचा आवाजही सोबतीला असतो. बसमधले लोक मोठमोठय़ाने आपल्या मोबाइलवर बोलत असतात. त्यांच्याकडे आपण त्रासिकपणे बघतो. कुठेतरी रस्त्याचे, नाहीतर बिल्डिंगचे काम चालू असते. त्यामुळे आपल्या नादविश्वात त्या भरभक्कम यंत्रांच्या भरदार आवाजांची भर पडते. तेवढय़ात कुठूनतरी एक मिरवणूक वाजतगाजत येते आणि कानठळ्या बसवणारे ढोलताशे, सॅक्सोफोन यांचे आवाज आपल्या सहनशक्तीचा अंत पाहू लागतात. न राहवून आपण आपला मोबाइल व त्याचे हेडफोन्स बाहेर काढतो आणि हे सर्व नकोसे आवाज विरून जातील इतक्या मोठय़ा आवाजात आपली आवडती गाणी ऐकू लागतो. थोडय़ा वेळाने आपला मोबाइल वाजतो.. किंबहुना तो व्हायब्रेट होतो म्हणूनच केवळ आपल्याला त्याची जाणीव होते. मग आपण गाणी ऐकणे थांबवून कॉल घेतो. पलीकडून येणाऱ्या आवाजासारखेच अनेक कर्कश आवाजांचे पाश्र्वसंगीत सोबत असते. मग मोबाइलसकट तोंडावर हात ठेवून आपण बसमधील इतरांसारखेच मोठमोठय़ाने बोलू (?) लागतो.. या साऱ्या आवाजांच्या गदारोळात आपला आवाज पलीकडच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी!

संपूर्ण लेख वाचाण्यासाठी ... http://bit.ly/LS_24_10