दिनांक २६ डिसेंबर २०१०च्या लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीमध्ये छापून आलेला माझा लेख,
एखादा पदार्थ तुमच्या कितीही आवडीचा असला तरी रोजच्या रोज फक्त तो एकच एक पदार्थ तुम्हाला कोणी खायला लावला तर काही दिवसांतच तो पदार्थ तुम्हाला अगदी नकोसा होईल. तुमच्या आयपॉडमध्ये सतत एकच गाणे वाजत राहिले तर शेवटी वैतागून तुम्ही तो आयपॉड भिरकावून द्याल! कारण आपल्याला जीवनात वैविध्याची आवड असते. मानवामध्ये असलेली ही वैविध्याची ओढ अगदी त्याच्या आदिमानव रूपातही अस्तित्त्वात होती. वेगवेगळी फळे चाखून आणि अनेक प्रकारच्या प्राण्यांचे मांस खाऊनच आपल्या पूर्वजांनी योग्य आहाराची निवड केली. पण पुढे वैविध्यपूर्ण प्रगती मानवाला साधता आली, ती त्याच्यापुढे असलेल्या अनेकविध पर्यायांमुळे आणि हे पर्याय उपलब्ध झाले ते निसर्गातील विविधतेमुळे.संपूर्ण लेख वाचाण्यासाठी ... http://bit.ly/LS_26_12
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा